सौ मनिषा सुरेंद्र निब्रड यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

वणी /

मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या यवतमाळ जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ.मनिषा ताई सुरेंद्र निब्रड यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला.

सोमवारी दिनांक ११ ऑगस्ट ला सायंकाळी वसंत जिनिंग लॉन येथे वाढदिवसानिमित्त छोटेखानी कार्यक्रमात मंजुळा माता महिलांच्या भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. 
 या कार्यक्रमात मंजुळा माता महिला भजन मंडळाचे प्रमुख राजेंद्र कोरडे यांचा यावेळी निब्रड परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य परशुराम पोटे, अजय चन्ने, श्री. सुरेंद्र निब्रड, सौ.प्रेमीलाताई चौधरी यांच्यासह मित्र मंडळ नातेवाईक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post