वणी:-
भारतीय जनता पार्टी वणी शहर यांच्या वतीने तान्हा पोळा सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता कल्याण मंडपम आंबेडकर चौक येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेत अ गट व ब गटात विभागणी केली आहे.
अ गटात एक ते पाच वर्ष वयोगटातील यांना प्रथम बक्षीस पाच हजार रुपये द्वितीय बक्षिस तीन हजार रुपये तृतीय बक्षीस दोन हजार रुपये देण्यात येणार आहे. तर ब गटात पाच ते बारा वर्षे वयोगटातील यांना प्रथम बक्षीस पाच हजार रुपये द्वितीय बक्षीस तीन हजार रुपये तृतीय बक्षीस दोन हजार रुपये देण्यात येणार आहे. हि स्पर्धा निःशुल्क आहे.तसेच प्रत्येक गटात तीन प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात येईल. व प्रत्येक सहभागी स्पर्धकाला आकर्षक भेट वस्तू देण्यात येईल. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन मुख्य संयोजक रवी बेलूरकर तसेच वणी शहर अध्यक्ष ॲड निलेश चौधरी, स्पर्धा संयोजक आशिष डंभारे , स्पर्धा सहसंयोजक विलास डवरे,नितीन बिहारी, राजेंद्र जयस्वाल यांनी केले आहे.