निधन वार्ता, माजी सैनिक बापुराव केळकर यांचे निधन

वणी /

येथिल श्री उज्वल गौरक्षण संस्था जवळ वास्तव्यास असलेले माजी सैनिक श्री बापूराव उद्धवराव केळकर यांचे आज बुधवारी दिनांक 20 ऑगस्ट ला दुपारी 11:30 वाजता उपचारा दरम्यान नागपूर येथे निधन झाले ते 81 वर्षाचे होते.

 त्यांच्या मागे पत्नी शांताबाई व दोन मुले मनोज व महेंद्र केळकर व नातवंडे कुमारी संस्कृती, मिराज व यथार्थ आणि बराच मोठा केळकर परिवार आहे.
श्री बापूराव केळकर यांनी विद्यावाचस्पती प्राचार्य राम शेवाळकर यांचे ड्रायव्हर म्हणून त्यांनी 25 ते 30 वर्षे सेवा दिली.

उद्या दिनांक 21 ऑगस्ट ला 11:30 वाजता वनी येथिल मोक्षधाम मध्ये अंतिम संस्कार होणार आहे.

स्टिंग ऑपरेशन न्यूज तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली! 💐

Post a Comment

Previous Post Next Post