वणी :
वणी शहरापासून अवघ्या चार किमी अंतरावर असलेल्या मानकी गावात विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे जीवघेणा धोका निर्माण झाला आहे. या गावातील एक विद्युत खांब मुख्य रस्त्यावर म्हणजे रमेश ठेंगणे यांच्या शेताजवळ वर्दळीच्या रस्त्यावर धोकादायक रित्या वाकला असून, तो कोसळू नये म्हणून लाकडाच्या काठीचा आधार देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे जुन महिन्यात आलेल्या पहिल्याच पावसात वाकलेल्या हा खांब दुरुस्ती न करता दोन महिन्यांपासून लाकडाच्या काठीचा आधार देऊन आहे. त्यामुळे एखाद्या वेळी (Bent Electric Pole) खांब कोसळल्यास किंवा आधार तुटल्यास गंभीर अपघात होण्याची पुर्ण शक्यता आहे.
या धोक्याविषयी वारंवार विद्युत वितरण कंपनीला ग्रामस्थांनी माहिती दिली तरी अद्याप कोणतीही दुरूस्ती झाली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तिव्र नाराजी असून, तात्काळ (Bent Electric Pole) वाकलेला खांब दुरुस्ती करून सुरक्षित विद्युत पुरवठा करावा. अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, हा (Bent Electric Pole) खांब कधी कोसळेल सांगता येत नाही आणि तोपर्यंत विद्युत प्रवाह बंद असल्याने रहदारीच्या रस्त्यावर अंधार पसरलेला आहे. काही अपघात झाल्यास संपूर्ण जबाबदारी विद्युत वितरण कंपनीची राहील.