मा. श्री.नितिन बिहारी यांची भारतीय जनता पार्टीच्या व्यापारी आघाडी वणी शहर सरचिटणीसपदी निवड

वणी /

सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे, युवा तडफदार नेतृत्व, मा. श्री.नितिन गोपाल बिहारी यांची भारतीय जनता पार्टीच्या व्यापारी आघाडी वणी शहर सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.
हि निवड भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड प्रफुल चव्हाण यांच्या नियुक्ती पत्राद्वारे व भाजपाचे वणी विधानसभेचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली.
यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जेष्ठ नेते दिनकरराव पावडे, महादेवराव खाडे, माजी सभापती व जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, माजी महामंत्री व जिल्हा उपाध्यक्ष रवि बेलुरकर, डॉ. दिलीप अलोणे व जिल्हा उपाध्यक्ष ऍड. कुणाल विजय चोरडिया उपस्थित होते.
श्री नितीन बिहारी यांची वणी शहर व्यापारी आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

स्टिंग ऑपरेशन न्यूज तर्फे हार्दिक शुभेच्छा!💐

Post a Comment

Previous Post Next Post