वणी /
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांनी पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद यात्रा सुरू केली असून बुधवारी दुसऱ्या दिवशी मारेगांव तालुक्यात त्यांचा झंझावाती दौरा संपन्न झाला.
या दौऱ्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर सभा झाल्या असून बाळासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोकांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश घेतला. डॉ.नीरज वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, प्रस्थापित आणि मनुवादी पक्षाने बहुजन चळवळीचे अनेक तुकडे केले असून फुले शाहू आंबेडकरी शक्तीचे खच्चीकरण केले आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये केवळ बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हाच पक्ष वंचितांचा सत्तेकडे नेणारा मार्ग प्रशस्त करू शकतो. आणि म्हणून बेचाळीस लाख मतदानाचा टप्पा पार करणारा फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीतला हा एकमेव पक्ष असून बाळासाहेबांच्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवला पाहिजे, जेणेकरून वंचितांना सत्तेत भागीदारी मिळेल. डॉ.नीरज वाघमारे यांच्या संबोधनाने प्रभावित होऊन अनेक लोकांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला.
मारेगांव तालुक्यातील संपूर्ण दिवसभर झालेल्या भरगच्च सभांमधून जनतेने अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून डॉ.नीरज वाघमारे यांनी वणी व मारेगाव विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
या संवाद दौऱ्यात गावागावातील शेकडो नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेवर विश्वास ठेवून जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केला.
मारेगांव येथिल ज्ञानेश्वर मुन , सेख सलीम शेख रऊफ, निळावती मुन, मुज्जू भाई तर
आकापूर येथील सामाजिक कार्यकर्ता संजय वानखेडे उपसरपंच सौ.काटकर, धम्मराज भरणे,बंडू पुनवटकर,
प्रपिणभाऊ काटकर, रामनाथ भरणे, तर लाखापूर येथिल प्रदिप पेंन्दोर यांचे नेतृत्वात दिपक छापेकर, मंगेश चांदेकर यांचे सह असंख्य महिला पुरुष कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश, चिंचमंडळ येथिल ज्ञानेश्वर देठे, सिमा कवाडे, यांचे सह पक्षप्रवेश. मार्डी येथे यशोधरा लीहीतकर, विजय निमसटकर, रंजनाताई चंदनरखेडे,मेधाताई भगत,कलावतीबाई कांबळे , मंदाबाई निमसटकर, धनराज चंदनखेडे, यांचे सह असंख्य महिला पुरुष कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. तर देवाळा येथे करमनकर साहेब,मेघराज बेसेकर,सुबोध हस्ते, भोंगाडे ताई, मिराबाई करमनकर, निर्माणबाई अवथरे, यांचे सह पक्षप्रवेश. तर सिंदी येथे मनोज भगत,चिमनराव नरांजे,प्रतिक्षा भगत, रोहीत भगत,विनोद भगत, धिरज नरांजे, यांचे सह पक्षप्रवेश. मारेगाव येथील साई समिती सचिव गजानन चंदनखेडे यांचे नेतृत्वात असंख्य पुरुष महिला सह साई सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश.
बोटोणी येथे उमाकांत बारसाकडे, विक्री रामटेके, सौ. पुजा भसारकर,सौ. सासष्ठा बारसाकडे,सौ.अश्विनी रामटेके,
यांचे सह पक्षप्रवेश. नवरगांव येथे गयबिदास फुलझेले,मालाबाई फुलझेले,जगदिश रामटेके, प्रतिभा रामटेके,बंडू अवथरे, अशेड डंभारे,विनायक दारुंडे, कुमुद रामटेके, सुकेशिनी दारूंडे,
निळावती मुन,यांचेसह पक्षप्रवेश. सगणापूर येथे सुनील वाघमारे , मुरलीधर जिवणे तर सराटी येथे सिद्धार्थ बहादे, प्रशिक वानखेडे, शुद्धोधन वनकर, सालेभट्टी येथे लीलाधर कोरझरे, कोलगांव येथे अभिषा निमसटकर - सरपंच, कोलगांव, धीरज लोखंडे यांचे सह संवाद दौऱ्यात आलेल्या असंख्य युवक,महिला,पुरुष कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश झाला.
या संवाद दौऱ्यात खालील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग घेऊन वणी आणि मारेगांव तालुक्यात दौरा यशस्वी केला. यामध्ये मिलिंद पाटील-जिल्हा महासचिव, राजेंद्र निमसटकर, गौतदारुंडे- तालुकाध्यक्ष मारेगाव, गजानन चंदनखेडे, संजय जीवने -तालुका उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर मून, दिलीप पाटील, अनंत खाडे, वासूमित्र वनकर, गोरखनाथ पाटील, अभीषा निमसटकर, निळावती मून, लताबाई वनकर, बालू गजभिये, विजय खाडे, ज्ञानेश्वर धोपटे, गौतम ताकसांडे, धीरज लोखंडे, लीलाधर कोरझरे, राजू पाटील, बंटी बाभळे, अमर खैरे, कैलास खाडे, बाळू टेणपे, रामा पिपराडे, राजकुमार राऊत, शेख सलीम शेख रऊफ, प्रणिता काळे, नंदिनी ठमके.व परिसरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.