वणी /
नागरिकांमध्ये व तरूण पिढीमध्ये देशभक्तीची भावना रूजावी या हेतूने सर्व वणीकर देशभक्त नागरिकांच्या सहभागाव्दारे कुठल्याही राजकीय पक्षाचे बॅनर अथवा झेंडे न लावता वणीकर नागरिक म्हणुन दिनांक १४ ऑगस्ट ला सकाळी ९:३० वाजता "तिरंगा रॅली" काढण्यात येणार आहे.
यामध्ये शहरातील सर्व सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक संघटना सहभागी होणार आहे. सदर रॅली ही पद रॅली आहे. यात सर्व वणी तालुक्यातील नागरीकांनी व संस्थांनी सहभागी होण्याचे आव्हान आयोजकांनी केलेले आहे.
या रॅलीची सुरुवात शासकीय विश्रामगृह येथुन होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक, खाती चौक, महात्मा गांधी चौक, गाडगे बाबा चौक, काठेड ऑईल मिल चौक, सर्वोदय चौक, रविंद्रनाथ टागोर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक इत्यादी प्रमुख मार्गावरून रॅली लोकमान्य टिळक चौक येथे आल्यानंतर समारोप होणार आहे. अशी माहिती आयोजकांनी दिली.