एक दिवसीय कार्यशाळेत बचत गटांच्या महिलांना मिळाले व्यावसायिक मार्गदर्शन!

वणी /

नगर परिषद वनी व कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशन पुणे यांचे संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियान नागरी २.० अंतर्गत दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविकाअंतर्गत स्थापन केलेल्या महिला बचत गटातील एकूण ६० महिलांचे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते...
या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये महिलांना उपजीविकेकरिता सुका कचरा प्रक्रिया केंद्र चालवणे, पुनर्वापर योग्य बस्तु कचऱ्यात न जाऊ देता त्याचे वेगळे संकलन करून दुरुस्ती व विक्री करणे, इ-कचरा चालवणे, कपडयांच्या कचऱ्याचा पुनर्वापर, बांधकामाच्या राडारोड्यावर प्रक्रिया व उत्पादन, खतनर्मिती (कंपोस्टिंग बायोगॅस), फुलांच्या निर्माल्यापासून वापरलेल्या फुलांपासून अगरबत्ती बनविणे व जुन्या कपड्यांपासून विविध प्रकारचे पॉकेट, पर्स, पिशव्या बनाविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. व्यवसाय विषयक मार्गदर्शन व बाजारपेठ कशी उपलब्ध करता येईल, याबाबत माहिती देण्यात आली. नगरपरिषद वनी येथील स्वच्छता निरीक्षक वायदंडे सर , आणि NULM च्या शहर अभियान व्यवस्थापक एडवोकेट पौर्णिमा शिरभाते, उत्तम हापसे आणि शहर समन्वयक मयूर मुंदाने तसेच कुशाग्र फाउंडेशन पुणेचे प्रकाश जोगदंड, प्रफुल गायकवाड, आणि क्रांतीज्योती शहर स्तर संघ चे सर्व पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. 
एकदिवसीय कार्यशाळा यशस्वीतेसाठी समुदाय संघटक विनोद मनवर यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post