वणी /
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहामध्ये लोकमान्य टिळकांच्या स्मृती निमित्त १ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६-३० वाजता टिळक स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिक्षण प्रसारक मंडळ वणी चे अध्यक्ष विजय भाऊ मुकेवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या व्याख्यानात नागपूर येथील बिंझानी महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख संदीप तुंडुरवार हे लोकमान्य एक जीवन पद्धती या विषयावर व्यक्त होणार आहेत.
सलग ६१ वर्षाची परंपरा असणाऱ्या या व्याख्यानासाठी वणीकर जनतेने अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळ संचालक गण तथा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे यांच्यावतीने करण्यात येत आहे.