विविध परीक्षांतील गुणवंतांचा व भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ऍड प्रफुल चव्हाण यांचा शनिवारी सत्कार

वणी /

या उन्हाळी सत्रात दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली. त्यातील गुणवंतांचा सत्कार तसेच भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ऍड प्रफुल चव्हाण यांचा सुद्धा सत्कार समारंभ भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड कुणाल विजय चोरडिया यांच्या वतीने आयोजित केला आहे. शनिवार दिनांक 5 जुलै रोजी दुपारी 4.00 वाजता मुकुटबन रोडवरील श्री विनायक मंगल कार्यालयात हा सोहळा होईल.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, यवतमाळ जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे यवतमाळ व पुसदचे समन्वयक नितीन भुतडा आणि संघटन सरचिटणीस राजू पडगिलवार तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया प्रामुख्याने उपस्थित राहतील. 

शैक्षणिक गुणवत्तेस प्रोत्साहन देणारा हा प्रेरणादायी उपक्रम असल्याचे आयोजक तथा भारतीय जनता पार्टीचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट कुणाल चोरडिया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. या कार्यक्रमाचा विद्यार्थी आणि पालकांनी लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post