धोबी समाजाला अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन

स्टिंग ऑपरेशन न्यूज/

  धोबी जातीला अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी दिनांक ३० जून २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य धोबी समाज क्रांती विकास मंच आणि धोबी समाजाच्या सर्व संघटनांनी एकत्रितपणे नागपूरच्या संविधान चौकात महाराष्ट्र राज्य धोबी समाज क्रांती विकास मंच चे राज्य अध्यक्ष शेखर कनोजिया यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.
यावेळी राज्य महासचिव महेश देशकर, राज्य सहसचिव कैलास चौधरी, राज्य उपाध्यक्ष नितीन बिहारी यांची उपस्थिती होती.
 विशेष म्हणजे यावेळी धोबी समाजाच्या महिलांचाही मोठ्या उत्साहात समावेश होता.
सर्वप्रथम महामानव डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नारे लावून. या आंदोलनाला प्रारंभ केला. 
धोबी समाजाचे शेकडो अनुयायी या धरणा आन्दोलनात उपस्थित होते. 
 त्यानंतर धोबी समाजाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने निवेदन दिले.

Post a Comment

Previous Post Next Post