वणी /
आषाढी एकादशी निमित्त दि.५ व ६ जुलै रोजी टागोर चौकातील रंगारी पुरा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दि. ५ जुलै शनिवार रोजी सायंकाळी ६.३०वाजता नागपूर येथील नामवंत कीर्तनकार माधवबुवा धुमकेकर यांचे कीर्तन आयोजित असून
रविवार दि.६ जुलै रोजी दुपारी ३ वाजता उत्कृष्ट कीर्तनकार या पुरस्काराने सन्मानित सौ.मृण्मयी
कुळकर्णी(, नागपूर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ
श्रोत्यांना होणार आहे.त्या नंतर गुणवंत विद्यार्थ्यांच्या
सत्काराचे व जैताई भजन मंडळाच्या भजनाचे
आयोजन करण्यात आले आहे.
आषाढी एकादशीच्या आनंदात भर टाकणाऱ्या या सर्व कार्यक्रमांना बंधुभगिनींनी बहुसंख्येने उपस्थित
राहावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.