वणी /
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या मातोश्री, सौ. वंदना शामराव गोहोकार यांचे आज शनिवारी १९ जुलै ला दुपारी ०३.३० वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शेतात काम करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ही दुःखद घटना घडली. त्यांच्या निधनाने गोहोकार कुटुंबियांवर आणि मनसे कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे.
सौ. वंदना गोहोकार यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ७.०० वाजता त्यांच्या मूळगावी, पूरड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या मातोश्रींच्या निधनामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते अंत्यदर्शनासाठी पूरड येथे दाखल होत आहेत. त्यांच्या पाश्चात्य पती, २ मुले, सुना, नातवंड असा आप्त परिवार आहे.