वणी /
श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, वणी द्वारा संचालित, राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालययात शासकीय अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले.
"एक पेड माँ के नाम "या अभियानांतर्गत वृक्षारोपण, माता पालक संघ,शिक्षक पालक सभा, हरित सेना, नशा मुक्त कार्यक्रम घेण्यात आले.
या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी, जयंत सोनटक्के होते. तर प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सदस्य विक्रांत चचडा उपस्थित होते. अतिथी म्हणुन औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अतुल राजगडकर , तसेच राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक अभय पारखी सर तसेच समारोहाच्या अध्यक्षस्थानी वणी पब्लिक स्कूलचे प्राचार्य राकेश देशपांडे सर प्रामुख्याने उपस्थित होते.
आई आणि वृक्ष हे दोघेही आपाल्याला भरभरून देतात,यांच्यामुळेच जीवन समृद्ध, सुंदर होते.असे प्रतिपादन कवि, साहित्यिक उपमुख्याधिकारी नगरपरिषद वणी जयंत सोनटक्के यांनी भाषणातून व्यक्त केले असून आज झाडे लावली व जगवणे हि काळाची गरज आहे असेही अधोरेखित केले. यानंतर राकेश देशपांडे सर, अतुल राजगडकर प्राचार्य शाहू महाराज औद्योगिक प्रशिक्षण केंद्र यांनी झाडांचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अभय पारखी यांनी भाषणातून शासकीय अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या सहशालेय उपक्रमांसह "एक पेड माँ के नाम, या विषयावर अधिक माहिती दिली.
या कार्यक्रमात पालकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता, यावेळी पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभुदास नगराळे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगारेड्डी बोडखे यांनी केले तर आभारप्रदर्शन तुषार घाणे सर यांनी केले.
शेवटी कार्यमाची सांगता वृक्षारोपणाने पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक सौ.अनिता टोंगे, प्रतिष लखमापूरे,कु भाग्यश्री लांडे व शिक्षकेतर कर्मचारी राजेंद्र देवतळे, जितेंद्र डगावकर, हरीष बोढाले, सुनिल गेडाम, हरीष वासेकर व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतल.