गोदावरी अर्बन मुकुटबन शाखेकडून बॅरिकेट्सचे वितरण

वणी :- 

     सहकार क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसा.लि नांदेड, शाखा मुकुटबनचा, 5 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी दिनांक 18 जुलै मुकुटबन पोलीस स्टेशन ला बॅरिकेट्स चे वितरण करण्यात आले. 
     गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील,अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर सर, उप महाव्यवस्थापक दवे मॅडम, तसेच सहायक महाव्यवस्थापक रविजी इंगळे सर यांच्या विशेष उपस्थितीत तथा वणी शाखेचे शाखा व्यवस्थापक विजय मोडक यांच्या उपस्थितीत गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसा.लि नांदेड, शाखा मुकुटबन चा, 5 वा वर्धापनदिन दि.18 जुलै 2025 ला मोठ्या उत्साहात पार पडला.     
     रोपटं लावणं अगदी सोपं असतं, मात्र त्याची जोपासना करणं तितकंच कठीण..... आणि जोपासना जर योग्य पद्धतीने झाली तर...त्या रोपट्याचे रूपांतर एक मोठ्या वटवृक्षात पहावयास मिळते .... त्याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे आज आपल्यासमोर उभी असलेली गोदावरी अर्बनची मुकुटबन शाखा, आहे असे प्रतिपादन गोदावरी समुहाचे असिस्टंट जनरल मॅनेजर रवी इंगळे यांनी केले.
      यावेळी गोदावरी समूहाचे असिस्टंट जनरल मॅनेजर रवी इंगळे, वणी शाखा व्यवस्थापक विजय मोडक, मुकुटबन शाखेचे व्यवस्थापन समिती चे सर्व सदस्य, शाखाधिकारी धम्मपाल निमसरकार, उपव्यवस्थापक दिप्ती मल्लूरवार, अधिकारी चेतन ठाकरे, सहायक अधिकारी रवींद्र तावाडे, सहायक अधिकारी सचिन जुनगरी, विपीन गावंडे, सर्व दैनिक प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post