वणी /
शहरातील आंबेडकर चौक येथील श्री विठ्ठल रुक्माई हेमाळपंती देवस्थानात आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात भव्य दिव्य अश्या सभा मंडपाच्या भूमिपूजनांचा सोहळा संपन्न झाला.
नवशक्ती दुर्गा माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उद्घाटक संजय खाडे अध्यक्ष- जय जगन्नाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड वणी, संचालक कापूस उत्पादक पणन महासंघ मुंबई, तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले.
मंदिर कमेटिचे उपाध्यक्ष दौलत वाघमारे, प्रमोद लोणारे ,चंदन मोहुर्ले, नितीन बिहारी, पुरुषोत्तम मांदाडे, शिवा आसुटकर, प्रा.अमोल बदखल, राजकुमार अमरवानी, विनोद मुथा, विलास डवरे, स्वप्नील बिहारी, नितिन मसेवार,राजेंद्र जयस्वाल, सतीश कामटकार, पंजाब बेलुरकर अविनाश कामटकर, संजय लोणारे, धम्मा मनवर, अशोक मांदाडे ,मारोती गोखरे, सुरेश देशकर, विजय काकडे, भरत कडूकर, प्रभाकर आकुलवार, मयुर जोशी महाराज, प्रितेश मोहुर्ले, नीरज लोणारे, कार्तिक चांदेकर, रितेश सानेकर ,धनु उईके ,निकेश कडूकर, सुरेश मांडवकर, गणेश लाकडे यांची भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थिती होती .
यावेळी ट्रस्टचे -अध्यक्ष रवि बेलुरकर यांनी मंदिर सभागृह बांधून पुढच्या आषाढी एकादशी पर्यंत वणीतील भक्तांचे दर्शनासाठी लोकार्पन करण्याचा मानस दाखविला तेव्हा वणी शहरातील भाविक भक्तांचे मंदिरात दर्शनासाठी गर्दी उसळली होती या भूमिपूजन कार्यक्रमासाठी वार्डातील सर्व महिला व पुरुषांनी तसेच मुलांनी सहकार्य केले व नंतर दुपारी बारा वाजता फराळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
https://youtube.com/shorts/kvr3w1fzdma?si=fpwwsoreyqapge_e
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवशक्ती मंडळाचे सचिव -प्रमोद लोणारे यांनी केले तर उपाध्यक्ष- दौलत वाघमारे यांनी आभार मानले.