ताडपत्री झाकून ट्रकमध्ये अवैध रेती वाहतूक

वणी /

वणी परिसरात अवैध वाळूची तस्करी सुरुच असून शिरपूर पोलिसांनी चारगाव ते पुनवट रोडवर ताडपत्री झाकून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले. हे दोन्ही ट्रक शिरपूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून कारवाईबाबत पत्र वणी तहसील कार्यालयात देण्यात आले.
शुक्रवारी 6 जुन रोजी शिरपुर चे ठाणेदार माधव शिंदे हे आपले अधिनस्त पो. स्टॉप सह परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनिय माहीती मिळाली की, चारगांव ते पुनवट रोडने अवैध्यरित्या रेती वाहतुक होत आहे. अशी माहिती मिळताच ठाणेदार माधव शिंदे यांनी कोणताही वेळ न घालवता त्वरीत आपल्या पोलिस स्टाफ सह शेलु(बु) येथे नाकाबंदी केली काही वेळाने चारगांव ते पुनवट रोडने दोन ट्रक येताना दिसताच येणा-या संशयित तपकिरी रंगाच्या अशोक लेलेंन्ड कंपनीच्या दोन्ही ट्रकांना थांबवुन सदर दोन्ही ट्रकची तपासणी केली तेव्हा त्यांना सदर ट्रकमध्ये लाल रंगाची रेती दिसली, सदर रेती बावत रॉयल्टीची विचारणा केली असता कुठल्याही प्रकारचे (रॉयल्टी) कागदपत्रे व समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने सदर दोन्ही ट्रकमध्ये अवैद्यरित्या लाल रेती वाहतुक करीत आहेत अशी खात्री झाल्याने त्यांना ताब्यात घेउन नमुद वाहनातील इसमांना त्यांचे नाव व गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव ।) सैय्यद शहाबुद्दीन सैय्यद अफसर बय 33 वर्ष धंदा ड्रायव्हर रा. पुसद (खादी वॉर्ड) ता. पुसद जि. यवतमाळ 2) शेख हसन इमाम शेख उवेदुर रङझाक वय 51 वर्ष धंदा ड्रायव्हर ता. पुसद जि. यवतमाळ असे सांगितले व सदर अवैध्य रेती ही ट्रक मालक 3) उमर फारुख चय अं.45 वर्षे रा. पुसद ता.पुसद जि. यवतमाळ यांचे सांगणेवरुन वाहतुक करीत असल्याचे सांगितल्याने वरुन वरील इसमांविरुध्द दोन्ही ट्रक क्रमांक MH 29, BE-6296 व MH -29, BE- 6296 अंदाजे किंमत 50 लाख व त्यामध्ये एकुण 24 ब्रास रेती 1 लाख 92 हजार रुपये ची लाल रेती असा एकुण 51 लाख 92 हजार रुपये चा मुद्देमाल सहीत दोन्ही ट्रक ताब्यात घेउन पुढील कारवाईसाठी शिरपूर पोस्टे च्या आवारात लावण्यात आले असून दोन्ही ट्रक वाहनचालकांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच अवैध्यरित्या रेती बाबत पुढील कारवाईसाठी अहवाल तहसिल कार्यालय वणी येथे पाठविण्यात येणार आहे.

सदरची कारवाई यवतमाळ,पोलीस अधीक्षक, कुमार चिंता , अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप , वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किन्द्रे , पोलीस निरीक्षक सतीश चवरे सा. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पो स्टे शिरपुर येथील सपोनि माधव शिंदे ठाणेदार शिरपुर, पोउपनि/रावसाहेब बुधवंत, पोहवा/ प्रशांत झोड, पोकॉ/ पंकज कुळमेथे यांनी पार पाडली.

Post a Comment

Previous Post Next Post