वणी /
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिनांक 05 जून 2025 रोजी श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून "एक पेड माँ के नाम" अर्थात WOMEN FOR TREE या उपक्रमांतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात संजय खाडे संचालक कापूस उत्पादक पणन महासंघ मुंबई, इश्वर खाडे उपाध्यक्ष श्री लक्ष्मीनारायण नागरी सह पतसंस्था वणी, अशोक झाडे सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती वणी, राजु धावंजेवार,राज्याध्यक्ष मानवी हक्क सुरक्षा परिषद , परशुराम पोटे, सचिव- न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशन वणी इत्यादी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी पत्रकार महादेव दोडके, ज्ञानेश्वर बोनगीनवार, यांच्या सह श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक चेतन मांडवकर, अनुज भट, प्रफुल चटकी, प्रसाद राजुरकर, कैलास खिरटकर, सचिन ढवस, भारती आगुलवार, सोनाली पालकर, प्रिया चावरे, इत्यादी कर्मचारी वृंद उपस्थित होते.
वृक्षारोपण हे केवळ एकदिवसीय कार्यक्रम न राहता त्याचे सातत्यपूर्ण संगोपन होणे आवश्यक आहे "एक पेड माँ के नाम" या उपक्रमाने केवळ पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला नाही, तर मातृत्व व निसर्ग यांच्यातील नात्याची भावनिक जपणूकही अधोरेखित केली. असे श्री संजय खाडे यांनी यावेळी सांगितले.