भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल चव्हाण यांची विजय बाबू चोरडिया यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट...

वणी /

 भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा संकल्प ते सिद्धी अभियानाच्या समारोप कार्यक्रम रविवारी दिनांक २९ जुन रोजी वसंती जीनिंग हॉल, येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मा. अॅड. प्रफुल चौहान यांच्या वणी शहरात प्रथम आगमन निमित्त त्यांचा मोठ्या उत्साहात सत्कार व स्वागत केले.
नियोजित कार्यक्रमानंतर सायंकाळी सहा वाजता येथील सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री विजय चोरडिया यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री विजय चोरडिया व ऍड.कुणाल चोरडिया यांनी त्यांचा सन्मान केला.

Post a Comment

Previous Post Next Post