वणीतील फेरीवाल्यांवर वाहतूक पोलिसांची दंडेलशाही; मनसे वाहतूक सेनेचे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन

वणी / 

    बेकारी आणि बेरोजगारी वर पर्याय म्हणून रस्त्याच्या कडेला फळे, भाजीपाला आणि अन्य जीवनावश्यक वस्तू विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब फेरीवाल्यांना वाहतूक उपशाखा वणीचे अधिकारी आणि कर्मचारी अतिक्रमणाच्या नावाखाली दंडेल शाही दाखवत या लोकांना अर्वाच्छ भाषेत शिवीगाळ करून त्यांचे व्यवसाय उपयोगी साहित्य जप्त करत त्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास देण्याचे काम करत असल्याचा आरोप करीत मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी याबाबत आज जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन हा प्रकार थांबविण्याची मागणी केली आहे. 
रस्त्यावर अतिक्रमण करून धंदे थाटने व वाहतुकीस अडथळा निर्माण करणे याला मनसे कधीही समर्थन करीत नाही. परंतु या धंदे चालक विशेषतः महिला यांना वाहतूक पोलीस कर्मचारी ज्या अर्वाच्छ भाषेत बोलून त्यांचे व्यवसाय उपयोगी साहित्य जप्त करून त्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास देत आहे या प्रकाराला मनसेच्या वाहतूक सेनेने विरोध दर्शविला आहे. 
शहरामध्ये कापडाची व अन्य साहित्यांची मोठी बाजारपेठ आहे. सध्या शाळकरी विद्यार्थ्यांची गणवेशासाठी रेलचेल व कपड्यांच्या दरात व्यावसायिकांकडून सेलच्या नावावर सूट देऊन ग्राहक खेचण्याची चालू असलेली स्पर्धा यामुळे मुख्य बाजारपेठेत वाहनांची मोठी वर्दळ निर्माण झाली आहे. एका दुकानापुढे ४ वाहने पार्किंग करण्याची क्षमता असताना १० ते १२ वाहने लावण्यात येत आहे. तर उर्वरित वाहने रस्त्यावर अभे करीत असल्याने रस्ते पूर्णतः बंद होत आहे. परिणामी पायी चालणाऱ्या ग्राहकांना सुद्धा कसाबसा रस्ता काढून जावे लागत आहे. या ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी कोणतेही कारवाई करत नाही. त्यामुळे हे व्यावसायिक वाहतूक शाखेला दुर्लक्ष करण्यासाठी "विशेष गिफ्ट" देण्यात येते की काय.? असा सवाल मनसे कडून विचारण्यात आला.
त्यामुळे रस्त्यावर लघु व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यवसायिकां कडून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्यास त्यांना समज देऊन सक्त ताकीद द्यावी व अर्वाच्छ भाषा व असभ्य वर्तणूक थांबवावी. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी व स्थानिक मुख्याधिकारी यांना सुद्धा देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post