वीज पडून २२ बकऱ्यांचा मृत्यू... शासन झोपेत! – पण कुणाल चोरडिया ठरले खरे मदतीचे आधारस्तंभ.!

स्टिंग ऑपरेशन न्यूज/

मारेगाव तालुक्यातील वरुड या गावाच्या शेतशिवारात विजेच्या कडकडाटात शेतकऱ्यांच्या २२ बकऱ्यांचा मृत्यू झाला होता ही घटना रविवारी १८ मे रोजी घडली होती.
सदर घटनेमुळे डोळ्यासमोर आयुष्याचा आधार हरवलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू थांबत नव्हते… पण या दुःखद घटनेनंतर जेव्हा शासनाने केवळ मौन बाळगले, तेव्हा अॅड. कुणाल चोरडिया यांनी मात्र क्षणाचाही विलंब न करता सरळ मदतीचा हात पुढे केला!

सामाजिक कार्यासाठी सदैव सज्ज असलेले अॅड. कुणाल चोरडिया हे केवळ नावाने नव्हे, तर कामाने खरे कार्यकर्ता ठरले आहेत. संकटाच्या काळात सरकार जिथे झोपले होते, तिथे चोरडिया यांनी सदर कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात दिला आणि आपली माणुसकी जपली. त्यांच्या या मदतीमुळे फक्त बकऱ्यांचा नव्हे, तर एक शेतकरी कुटुंबाचा उध्वस्त होणारा संसार वाचला!

चोरडिया यांचे सामाजिक कार्य हा त्यांच्याकडून चालत आलेला वारसा आहे – त्यांचे वडीलही सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. शेतकरी आत्महत्या, आदिवासी समस्या, क्रीडा क्षेत्रातील युवांचे मार्गदर्शन अशा अनेक आघाड्यांवर त्यांनी काम केले आहे. आज यवतमाळ जिल्हा आत्महत्या ग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा स्थितीत खऱ्या अर्थाने कुणाल चोरडिया हे शेतकऱ्यांचे मित्र आणि संकटमोचक बनले आहेत.

शासनाच्या मदतीची वाट न पाहता सरळ मदत करणाऱ्या अशा व्यक्तींमुळेच आज समाजात अजूनही माणुसकीचा श्वास जिवंत आहे! आजच्या युवापिढीला कुणाल चोरडिया यांच्यासारख्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. त्यांच्याकडे पाहणारा तरुणाईचा विश्वास दिवसेंदिवस दृढ होत आहे.

ही घटना केवळ एक मदत नव्हती – ही होती माणुसकीची, संवेदनशीलतेची आणि कर्तव्यनिष्ठेची जिवंत उदाहरण! 

Post a Comment

Previous Post Next Post