डॉ. प्रिया झाडे यांचे आकस्मित नीधन

वणी /

शहरालगत असलेल्या चिखलगाव येथील महादेव नगरिमध्ये वास्तव्यास असणाऱ्या डॉ. चंद्रकांत झाडे यांच्या पत्नी सौ. डॉ प्रिया चंद्रकांत झाडे यांचे सोमवारी रात्री १०:०० वाजताच्या सुमारास आकस्मित नीधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून वणी येथे आपली डॉ सेवा देणाऱ्या प्रिया झाडे यांच्या आकस्मित निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. आज मंगळवारी सकाळी ११ वाजता चिखलगाव येथील मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यविधी होणार आहे. त्या मारेगावच्या माजी नगराध्यक्षा इंदुताई किन्हेकर यांच्या कन्या होत्या.

डॉ प्रिया यांच्या मागे पती चंद्रकांत झाडे , मुलगी नायरा, सासू असा बराच मोठा परिवार आहे. डॉ प्रिया यांच्या अचानक जाण्याने समाजमन हळहळले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post