उद्यापासून वणीत श्री खाटूश्याम बाबा महोत्सव

वणी :- 

शहराच्या योगीराज नगरीत बस स्टँडचे मागे वणीतील पहिले श्री खाटूश्याम बाबा मंदीर उभारण्यात आले आहेत. या मंदीरात विविध मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यासाठी सात दिवस २ जुन ते ८ जुन पर्यंत प्राणप्रतिष्ठा महोत्सव साजरा केला जाणार आहे. 
 २ जुनला गणेश पुजन व कलशयात्रेने महोत्सवाची
सुरुवात होणार आहे. त्यानंतर दररोज देवपूजन, हवन यज्ञ, अनुष्ठान, यासोबतच सुंदरकांड पाठ, राणीसती दादी संपूर्ण मंगल पाठ, श्री संत गजानन महाराज मंत्र जप व पारायण, नृत्य, भजन संध्या, अखंड ज्योतीपाठ, विविध मनोहर झाँकी, नाटीका, महायज्ञ, श्रृंगार कीर्तन, व महाप्रसाद असे विवीध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. सदर मंदीरात दि 8 जूनला श्री श्याम बाबा, श्री सालासर बालाजी, श्री राणीसती दादी यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. प्राणप्रमिष्ठा सोहळा उत्तर प्रदेशातील चीत्रकुट येथील पुरोहीतांचे हस्ते पार पाडला जाणार आहे.भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा अशी विनंती आजोजकांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post