त्या दरोड्यातील मास्टरमाइंड मारेगाव येथिल महीलेला केली अटक, आता एकुण आरोपींची संख्या झाली आठ, दरोडेखोरांनी भरदुपारी कुठे टाकला होता दरोडा...! वाचा बातमी

स्टिंग ऑपरेशन न्यूज/

मागील महिन्यात 25 मार्च रोजी दारव्हा शहरातील एका किराणा व्यावसायिकाच्या घरी भरदुपारी पडलेल्या दरोड्याच्या तपासात दारव्हा पोलीसांना आणखी मोठे यश मिळाले आहे. या दरोड्यातील मास्टरमाईंट रविंद्र मोतीराम पोकळे (55) रा. बारीपुरा, दारव्हा ता. दारव्हा याचे संपर्कात असलेली महीला आरोपी सौ. मंदा कमलेश पासवान (41) रा. मारेगाव ता. मारेगाव जि. यवतमाळ यांना पोलीसांनी अटक केली आहे.

या दरोड्याच्या तपासा दरम्यान सुरवातीलाच अतिशय वेगाने सुत्रे हलवुन अवघ्या दोन तासात सहा आरोपीतांना अटक करुन गुन्ह्यातील संपुर्ण मुद्देमालासह एकुण 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला असुन सर्व आरोपी नांदेड जिल्ह्यातील आहेत. नांदेड जिल्ह्यातील आरोपीतांनी दारव्हा शहरात येवुन भरदिवसा दरोडा टाकला कसा? हा प्रश्न पोलीसांना सतावत होता. दारव्हा पोलीसांनी सायबर पोलीस स्टेशनचे मदतीने तांत्रिक तपासावर भर दिला. नांदेड येथील टोळीस दारव्हा येथे दरोडयासाठी आणनाऱ्या एक फरार आरोपीस तसेच स्थानिक सुत्रधार आरोपी रविंद्र मोतीराम पोकळे रा. बारीपुरा, दारव्हा ता. दारव्हा यांचे सतत संपर्कात असल्याचे तांत्रिक तपासावरुन निष्पन्न झाले. यावरुन दारव्हा पोलीसांनी महीला आरोपी सौ. मंदा कमलेश पासवानं वय 41 वर्षे, रा. मारेगाव ता. मारेगाव यांना दिनांक 13 एप्रिल रोजी मारेगाव येथुन ताब्यात घेवुन तपास केला असता, त्यांनी गुन्हयाबाबत माहीती दिली आहे. त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली असुन पुढील तपास सुरु आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक, कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक, पियुष जगताप, सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, दारव्हा चिलुमुला रजनीकांत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी (ठाणेदार), सहा. पोलीस निरीक्षक विजय महाले स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ, पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर कार्यदे, पोहेकॉ. महेंद्र भुते, पोहेकॉ. बबुल चव्हाण, पोहेकॉ. सोहेल मिर्झा, पोहेकॉ. मिथुन जाधव, पोकॉ. अमित झेंडेकर चापोहेकॉ. जितेंद्र चौधरी, मपोशि. स्नेहल गिरी, मपोशि. अंजली कवचट यांनी पार पाडली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post