श्री रंगनाथ स्वामी सेवा समिती कडून हनुमान जन्मोत्सव साजरा

वणी /

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री रंगनाथ स्वामी मंदिरात श्री रंगनाथ स्वामी सेवा समिती कडून हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

  सकाळी 5 वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते विजय भाऊ चोरडिया यांच्या हस्ते अभिषेक केला.
 7 वाजता हनुमान चालीसा आणी आरती त्यानंतर ह.भ.प. मनु महाराज यांचे सुंदर कांड कार्यक्रम घेण्यात आला. दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
श्री रंगनाथ स्वामी सेवा समितीचे अध्यक्ष विशाल ठोंबर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर दुधलकर सचिव राजेश मारगमवार,सहसचिव रविन्द्र गौरकार, कोशाध्यक्ष अनंता मिलमिले, सदस्य संजय जुनघरे, विलास पारखी, उत्तम दोरखंडे , गजेन्द्र भडगरे, सचिन पिदुरकर धर्म काकडे,अवी बोबडे,महेन्द्र तिकनायक सचिन पारटकर विलास पिंपळशेंडे, विजय बुरटकर , विजय जुनघरी, रोहित ठोंबरे, तन्मय जुनघरे, दुंशात मिलमिले, साई दुधलकर, साईनाथ जुनघरी, रवी त्रिवेदी इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post