वणी /
पायलट होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र त्यांना नेमकी दिशा सापडत नाही. कोणी मार्गदर्शक सापडत नाही. मात्र आता ही चिंता करण्याचं काही कारण नाही. पायलट होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. येत्या १ मेला सायंकाळी सात ते आठ या वेळेत मोफत वेबिनार आयोजित केलेला आहे. या वेबिनारला यवतमाळ जिल्ह्यातील पहिली महिला पायलट कॅप्टन प्रियंका परळीकर भावसार मार्गदर्शन करणार आहे. विशेष सांगायचे झाल्यास प्रियंका यांनी या क्षेत्रातील कोणतेही मार्गदर्शक नसताना हिम्मत केली. स्वबळावर अमेरिकेत जाऊन विमानाचे लायसन्स मिळवले. त्यानंतर हेलिकॉप्टर उडवण्याचे लायसन्स मिळवले. या प्रवासात असंख्य अडचणी आल्यात. परंतु ध्येय प्राप्तीची जिद्द आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर ती यशस्वी झाली. प्रियंकाला यश मिळालं. तिचं पायलट होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. ते इच्छुक सगळ्यांना पूर्ण करता यावं, म्हणून हा बेबी विबिनार आहे. या वेबिनारमध्ये सर्वांनी जॉईन व्हावे. त्यासाठी क्यू आर कोड दिलेला आहे. अशी विनंती नागपुर येथील निवृत्त अधिकारी तुषार परळीकर यांनी सोशल मीडियावरून केली आहे.