देशी दारुचा अवैध साठा जप्त, स्थानिक गुन्हे यवतमाळ शाखेची कारवाई

स्टिंग ऑपरेशन न्यूज/

आगामी सण उत्सवाचे पार्श्वभुमीवर जिल्हयात सर्वत्र कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी यादृष्टीकोणातुन मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील अधिकारी अंमलदार यांना जिल्हयातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटण करणे संबंधाने प्रभावी कारवाई करण्याच्या व विशेषतः अवैध दारु विक्री वाहतुक व साठवणुक संबंधाने गोपणीय माहिती काढुण जास्तीत जास्त कारवाई नोंद करण्याचे आदेशीत केले असल्याने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी आपल्या अधिनस्त पथकांना अवैध दारु संबंधाने दैनंदिन गोपणीय माहिती काढुण केसेस करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यावरुन दिनांक १२/०४/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पोलीस ठाणे पांढरकवडा हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपणीय माहिती प्राप्त झाली की, पोलीस ठाणे पांढरकवडा हद्दीतील ग्राम सायखेडा (जुना) परिसरात राहणारा इसम नामे बजरंग रुपसींग चव्हाण वय २५ वर्षे, रा. सायखेडा (जुना) हा आपले राहते घराशेजारील पडक्या घरात अवैधरित्या देशी दारु बाळगुण आहे अशा माहिती वरुन त्याचे घराशेजारी पडक्या घरात छापा कारवाई केलो असता खाकी रंगाचे २२ बॉक्स ज्यामध्ये १० एम.एल. क्षमतेचे डेक्कन रुपेश संत्रा कंपनीची देशी दारु त्याच प्रमाणे एका पांढऱ्या रंगाचे प्लास्टीक पोत्यात ९० एम.एल. क्षमतेच्या १०० शिश्या अशा एकूण ९० एम.एल. क्षमतेच्या डेक्कन रुपेश संत्रा कंपनीच्या देशी दारुच्या २३०० नग शिश्या प्रत्येकी किमंत ३४.७५ या प्रमाणे एकुण ७९९२५ रुपयाच्या मिळुन आल्याने जप्त करुन आरोपी बजरंग रुपसींग चव्हाण याचे विरुध्द पोलीस ठाणे पांढरकवडा येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप, श्री. सतिश चवरे पो.नि. स्थागुशा. यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि अजयकुमार वाढवे, पोउपनि धनराज हाके, सुनिल खंडागळे, उल्हास कुरकुटे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, नरेश राऊत सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post