वणी /
पोलीस स्टेशन वणी येथील एकुण 34 मोटार वाहनांचा मा. न्यायालयाच्या आदेशाने निकाल लागलेल्या गुन्ह्यातील वाहनांचा लिलाव करण्याची प्रक्रीया दिनांक 12/04/2025 रोजी 11 वाजता पासुन वणी पोलीस स्टेशन येथे नियमाप्रमाणे करण्यात येणार आहे.
सर्व नागरीकांना आव्हान करण्यात येते की,
दिनांक 12/04/2025 पुर्वी कोणास काही मालकी हक्क सांगावयाचा असेल त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन, वणी येथे वाहनाचे मुळ कागदोपत्री/दस्तऐवजासह हजर यावे. जर मुदतीत कोणीही योग्य हरकती न दाखविल्यास 34 वाहनांचा नियमाप्रमाणे लिलाव करण्यात येईल, तद्नंतर कोणतेही आक्षेप/हरकत नोंद घेण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.