वणी :
वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजा मानकी ग्रामपंचायत कार्यालयात - परमपूज्य भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. ग्रामपंचायतीचे सरपंच कैलास पिपराडे यांच्या हस्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी पोलीस पाटील सौ. मिनाक्षी मिलमीले, ग्रामपंचायत सदस्या सौ. नलिनी मिलमीले, अंगनवाडी सेविका सौ बेबीताई मालेकर, सुनीता पत्रकार, परशुराम पोटे, प्रदिप मालेकर, अविनाश सरवर, अमर खुसपुरे आदी उपस्थित होते.