विषारी औषध प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

वणी /

तालुक्यातील ईजासन (गोडगाव) येथे शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी दि. ३ एप्रिल रोजी घडली होती. या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान बुधवारी दि. ९ एप्रिल रोजी मृत्यू झाला आहे. 

शेतकरी बाबाराव जनार्दन गौरकार (वय ५८) रा. ईजासन (गोडगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. 
वणी तालुक्यातील ईजासन शेत शिवारात दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता काहीतरी विषारी द्रव्ये सेवन केल्याने त्यांना प्रथम वणी रुग्णालय येथे प्रथमोपचार करून त्यांना येथिलच एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तब्बल सात दिवसांनंतर तेथे त्यांचा उपचारादरम्यान दि.९ एप्रिल रोजी मृत्यू झाला. घटनेची माहिती वणी पोलीसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.

मृतकाचे पश्चात पत्नी एक मुलगा व एक विवाहित मुलगी असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र त्या शेतकऱ्याने कोणत्या कारणावरून विषारी औषध प्राशन केले याची माहिती मिळू शकली नाही. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post