अवैध वाळू वाहतूक, ट्रक्टर पकडलामहसूल विभागाची कारवाई

वणी /

वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर वणीचे नायब तहसीलदार अशोकराव ब्राह्मणवाडे यांनी पकडून जप्त केला. ही कारवाई मंगळवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या दरम्यान तालुक्यातील उमरी येथे करण्यात आली.

वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळुची अवैध वाहतूक रात्रंदिवस सुरू आहे कायर कडून उमरी गावाकडे टॅक्टरने वाळुची चोरटी वाहतुक करीत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. माहिती मिळताच वरीष्ठांच्या आदेशानुसार तहसीलदार अशोकराव ब्राह्मणवाडे व तलाठी विरुटकर हे दोघेही आपल्या दुचाकीवरून उमरी फाट्यावर पोहोचले तिथे दबा धरून बसलेल्या या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना  
यावेळी एक ट्रॅक्टर व वाळूने भरलेली ट्रॉली उमरी गावाकडे येताना दिसून आली. ट्रॅक्टर थांबवून चालकाला विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने कारवाईसाठी सदरचे ट्रक्टर तहसील कार्यालयासमोर लावण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post