जय जय श्री राम नामाच्या गजराने वणी शहर दुमदुमूले , प्रभू श्रीराम नवमी उत्सव शोभायात्रेतल्या देखाव्यांनी वणीकर सुखावलेत, काय तो महाकाय बजरंग बली आणि वानररूपी मानव रथ घोडे आणि पालखी....

वणी /

 शहरात ठिकठिकाणी रामनवमी उत्सव उत्साहात साजरा झाला. या निमित्त शहरातील विविध राममंदिरात अनेक कार्यक्रम झालेत. सायंकाळी प्रभू श्रीराम नवमी उत्सव शोभायात्रा समितीने यावर्षीदेखील आकर्षक आणि भव्यदिव्य शोभायात्रा काढली. या शोभायात्रेत अनेक देखावे होते. त्या देखाव्यांनी वणीकर सुखावलेत.  
हरियाणाहून हनुमानाची वेशभूषा करून आलेली धिप्पाड आणि महाकाय व्यक्ती या शोभायात्रेचं आकर्षण ठरली. हनुमानची चाल आणि रामभजन करणारे दृष्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. या महाकाय हनुमानासोबतचा वानररूपी मानव सर्वांचं लक्ष वेधत होता. त्यांना पाहायला सगळे वणीकर घराबाहेर पडलेत.
रविवार दिनांक 6 एप्रिलला जुन्या स्टेट बँकेजवळील राम मंदिर येथे संध्याकाळी प्रभू श्रीरामांच्या रामरथाचे पूजन झाले. तिथूनच शोभायात्रेला सुरुवात झाली. अनेक वर्षांपासून वणीमध्ये ही परंपरा कायम आहे. प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त वणी येथे रामरथ काढला जातो. असे प्रभू श्रीराम नवमी उत्सव शोभायात्रा समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले होते.
अयोध्येतील रामलल्लांची मूर्ती, श्रीकृष्णाच्या लीला, भगवान शंकर आणि हनुमानाच्या मूर्ती, रथ, घोडे, पालख्या विविध भजन मंडळे लक्षवेधक होते. याशिवाय, रामरथ आणि रामपालखी डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. घोडे, विविध बँड पथके अशा विविध पालख्यांसह ही शोभायात्रा निघाली. संपूर्ण वणी शहर भगवामय झाले. चौका-चौकांत रांगोळ्यांनी सजावट केली होती. ठिकठिकाणी वणीकरांनी शोयात्रेतील सहभागींसाठी पिण्याचे पाणी, शीतपेय, सरबत, न्याहारीची व्यवस्था केली होती. 
ही शोभायात्रा राम मंदिर (जुनी स्टेट बँक) येथून सुरू झाली. श्याम टॉकीज चौक, काळाराम मंदिर मार्ग, श्री रंगनाथ स्वामी मंदिर चौक, भगतेेसिंग चौक, गाडगेबाबा चौक, सर्वोदय चौक, टागोर चौक, तुटी कमान, गांधी चौक, खाती चौक, टिळक चौक, आंबेडकर चौकमार्गे पुन्हा राम मंदिरात महाआरतीने समारोप झाला. 

Post a Comment

Previous Post Next Post