ऐन वेळी त्याने तिला दिला धोका! मग तिने केली तक्रार, पोलीसांनी केला गुन्हा दाखल

वणी /

आज ना उद्या तुझ्यासोबत लग्न करेन. अशी विविध स्वप्ने तो तिला दाखवत होता. तो विवाहित पुरुष आणि ती विवाहित गृहिणी होती. दोघेही वणीतच राहणारे. त्या पुरुषाने तिच्यासोबत लगट वाढवली. तिच्यासोबत शारीरिक संबंधही ठेवले. मात्र ऐनवेळी त्याने धोका दिला. त्याने नंतर तिच्यासोबत लग्नास चक्क नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. मग अखेर पीडित विवाहितेने पोलीस स्टेशन गाठले. त्या विवाहित इसमाची तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 69, 351 (2), (3) नुसार गुन्हे दाखल केलेत.

तक्रारीनुसार फिर्यादी विवाहिता ही ३१ वर्षांची आहे. ही वणीतच राहणारी असून साधी गृहिणी आहे. कधीतरी दोन ते तीन वर्षांपासून तिचा या विवाहित आरोपीशी परिचय झाला. तेव्हापासून या दोघांची ओळख आहे. मग संपर्क वाढत गेला. या दाट परिचयातून त्यांचे प्रेम जुळले. पुढे चालून आरोपीने तिला लग्नासाठी प्रपोज केले. फिर्यादीला आशेवर ठेवले. या दरम्यान त्यांच्यात अनेकदा शारीरिक संबंध निर्माण झालेत.

मात्र अलीकडे त्यांच्या नात्यात वितुष्ट आले. दोघांतील संबंध तणावाचे झालेत. त्यामुळे फिर्यादी ही आरोपीला भेटण्यास टाळायची. त्याला नेहमीच नकार देत होती. त्यामुळे आरोपीने पीडितेला धमकावणे सुरू केले. तिचे त्याच्याकडे व्हिडीओ व फोटो असल्याचे सांगितले. हे फोटो तिच्या नव-याला पाठवेल, अशी त्याने धमकी दिली. अखेर पीडितेने वणी पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. प्रकरणाचा तपास पोउनि अश्विनी रायबोले करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post