शेतात काम करतांना अंगावर विज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

स्टिंग ऑपरेशन न्यूज/

 शेतात काम करतांना शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना आज गुरुवार ला सकाळी 9 वाजताचे दरम्यान उघडकीस आली आहे.

वसंतराव नरसिंग चव्हाण (40) असे वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

 नेहमीप्रमाणे आज गुरुवारी सकाळी मृतक शेतकरी हा शेतात काम करीत होता. गत दोन दिवसापासून वातावरणात कमालीचा बदल होवून आज सकाळी झरी तालुक्यातील बंदी वाढोणा परिसरात तुरळक पाऊस झाला. अशातच विजेचा कडकडाट होवून शिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळली. यातच चव्हाण हे शेतकरी जागीच गतप्राण झाले. या दुर्देवी घटनेने बंदी वाढोणा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृतक शेतकऱ्याच्या पश्चात आई वडील, पत्नी व दोन मुले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post