वणी /
जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना येथिल शिवसेना युवासेना शिंदे गट यांच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या आत्म्याला शांती लाभन्या करिता श्रध्दांजली वाहिली. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथिल वैसरन येथे दोन दहशतवादी लष्करी गणवेशात तेथील पर्यटकांवर गोळीबार केला त्यात 26 पर्यटक मृत्यू मुखी पडले व 15 च्या वर पर्यटक जखमी झाले असल्याने मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना शांती लाभन्या करिता व जखमी पर्यटकांची प्रकृती लवकरात लवकर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होवो याकरिता एकत्रित येऊन देवास प्रार्थना केली व हल्याचा निषेध केला.
या निषेधात वणी शहर व तालुका शिवसेना शिंदे गटाचे मनिष सुरावार, किशोर नांदेकर, सुनील डोंगरे, प्रेम ढवले, संजू तोमस्कर, सुमीत केशवाणी, मनोज नवले, नोमेश्वर पाणघाटे, अमृत पुरी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.