वणी /
नगर वाचनालयाचे अध्यक्ष व विदर्भ साहित्य संघ वणीचे कार्याध्यक्ष माधव सरपटवार यांनी विविध पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावनांचे पुस्तक नागपूर येथील समाजसेविका डॉ.संध्या पवार यांनी तयार करुन त्याचे विमोचन वणी येथील एका समारंभात केले. निमित्त होते सरपटवार यांच्या ८४ व्या वाढदिवसाचे.समारंभाध्यक्ष होते
नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.भालचंद्र चोपणे, प्रमुख अतिथी म्हणून विजय बाबू चोरडिया , संजय खाडे व डॉ.संध्या पवार उपस्थित
होते.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात वणीतील राजा पाथ्रडकर ,
मुन्नाभाऊ तुगनायत व विनय कोंडावार या तीन ज्येष्ठ समाजसेवकांचा सरपटवार यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन
सत्कार केला.
सरपटवार यांना जन्मदिवसा निमित्त विविध संस्थांनी सन्मानित केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष व डॉ.संध्या पवार यांनी
सरपटवार यांच्या सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जैताई मंदिराचे सचिव मुन्नालाल तुगनायत यांनी केले.नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी कार्यक्रमाचे सुरेख संचालन केले आणि मित्रमंडळाचे अध्यक्ष उत्तम गेडाम यांच्या आभार प्रदर्शनाने
कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुन्नाभाऊ पोद्दार, मुलचंद जोशी
व नामदेव पारखी यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमापूर्वी वादळ व पाऊस झालेला असतांना आणि गावात अंधाराचे साम्राज्य असूनही
कार्यक्रमाला श्रोत्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.