वणी /
वणी पोलीस स्टेशन हद्दीतील नायगांव (खुर्द) शिवारात सुशगंगा पॉलिटेक्निक जवळ एका शेतामध्ये आज शनिवारी सायंकाळी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.
सदर घटनेची माहिती वणी पोलीस स्टेशन ला कळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठुन मृतदेहाची पाहणी करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आला आहे. सदर इसमाची अजून ओळख पटली नसून सदर ईसम कोणाच्या ओळखीचा असल्यास वणी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा, असे आवाहन वणी पोलीस हे. कॉ.मारोती पाटील मो नं .९७६३३०४७८१ यांनी केले आहे.