वेगवेगळ्या ठिकाणी दोघांची आत्महत्या , चिखलगाव येथे ५५ वर्षीय इसमाने तर पुरड (पुनवट) येथे २५ वर्षीय तरुणीने घेतला गळफास

वणी /

वणी हद्दीत येत असलेल्या चिखलगाव येथे एका ५५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. 

  संभा बापुराव निकोडे वय.५५ वर्ष असे मृतकाचे नाव आहे. शुक्रवारी दि.१८ एप्रिल ला सकाळी घरी कोणी नसल्याचे साधुन त्यांनी आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना घरच्या लोकांना कळली तेव्हा बघ्यांची एकच गर्दी झाली घटनेची माहिती वणी पोलीसांना देण्यात आली माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले मॄतदेहाची पाहणी करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे पाठविण्यात आला त्यानंतर मॄतदेहाचे शवविच्छेदन करुन मॄतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

दुसरी घटना शिरपुर पोलीस स्टेशन हद्दीतील पुरड (पुनवट) येथे घडली आहे तेथील एका २५ वर्षीय तरीणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पायल बालाजी उरकुटे 
वय.२५ वर्ष रा. पुरड (पुनवट) असे मृतक तरुणीचे नाव आहे.
 दिनांक १८ एप्रिल ला दुपारच्या सुमारास पायल चे आई वडील शेतात गेले असता पायल ने संधीचा फायदा घेत घराच्या आडोश्याला दुपट्टा बांधून आपली जिवन यात्रा संपवली  
हि बाब घरच्या मंडळींना कळल्यावर एकच आतंक झाला 
काय झाल हे कोणालाच कळेना सदर बाब शिरपूर पोलिस स्टेशन ला कळविण्यात आली घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेत पायल चा मॄतदेह आपल्या ताब्यात घेतला आणी उत्तरीय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मात्र पायल ने आत्महत्या सारखें पाऊल का उचलले हे अजुन गुलदस्त्यात आहे पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post