वर्धमान फाउंडेशन तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणपोईचे उद्घाटन... , शहरात येणाऱ्या नागरिकांना मिळणार थंड पाणी...

वणी /

 उन्हाळा सुरू झाला की सर्वत्र उकडायला लागतं, वातावरण संपूर्ण उष्ण झाल्यामुळे सर्वांना पाण्याची आवशकता असते. वणी शहरात ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. भय उन्हाळ्यात पाणी कुठेही मिळत नाही. त्यामुळे वर्धमान फाउंडेशन च्या वतीने शहरातील विविध ठिकाणी थंड पाण्याची व्यवस्था 'पाणपोई' सुरू करण्यात आली आहे. 
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी सकाळी पाणपोई सुरू करण्यात आली.
   या पाणपोईचे उद्घाटन वर्धमान फाउंडेशन चे अध्यक्ष व समाजसेवी विजय चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आले. 
 यावेळी राजू खिवंसरा, अनिल चिंडालिया, महावीर कटारिया, सुरेंद्र डुंगुरवार, नितीन मुथा , आशिष सिसोदिया, संजय बोथरा, संदीप बोथरा, अजित मुनोत, राजेश बोथरा, निलेश लोढा, रवि रिंगोले, रोशन कटारिया, श मानवी हक्क सुरक्षा परिषद राज्य अध्यक्ष राजू धवांजेवार, परशुराम पोटे, सागर मुने, संदीप बेसरकर, महादेव दोडके सह नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post