वणीत रंगणार कबड्डीचा थरार...खासदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन

वणी /

 स्व. खासदार बाळू धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सौजन्याने तीन दिवसीय भव्य खासदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्व बाळू धानोरकर हे क्रीडा प्रेमी होते स्थानिक खेळाडूंना हक्काचं मैदान मिळावं त्यांनी आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवावी याकरिता
 त्यांनी अनेक ठिकाणी यशस्वी क्रीडा स्पर्धा घेतल्या
 त्यांच्या निधनानंतर क्रीडा स्पर्धा अविरत सुरू राहाव्या या करिता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पुढाकार घेतला आहे. 

वणी येथील शासकीय मैदानावर दि. 4, 5 व 6 एप्रिल ला खासदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे गादी वर होणाऱ्या या स्पर्धेत मुंबई, नागपूर, बारामती, अकोला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, येथील नामवंत संघ सहभागी होणार असून प्रथम विजयी संघाला 1 लाख, द्वितीय विजयी संघाला 71 हजार, तृतीय विजयी संघाला 51 हजार,तर चतुर्थ विजयी संघाला 31 हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. 

तसेच वैयक्तिक बक्षिसांची लयलूट होणार आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी युवा नवरंग क्रीडा मंडळा चे सचिन टेकाम, आशिष धोंगडे, संदीप फटाले, विशाल नैताम यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post