वनरक्षकाच्या निलंबनासाठी आमरण उपोषण सुरू

वणी /

हिरापुर बिट च्या वनरक्षकाला निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी येथिल ए.सि.एफ कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज चौकात अडेगाव येथिल बंडु गोहणे, दिनेश जिवतोडे, देवानंद गाडामोडे, रविंद्र गाडामोडे असे चार व्यक्तींनी सोमवारपासून उपोषण सुरू केले असून आज २५ मार्च ला त्यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

२ मार्च २०२५ रोजी रात्री महिला वनरक्षक (हिरापूर बीट ) यांनी वनविभागाच्या हद्दीत नसताना सुद्धा अवैधरीत्या रेतीचा ट्रॅक्टर पकडून बळजबरीने ४० हजार वसूल केले. ४० हजार बळजबरीने वसुली करिता वनमजूर व महिला वनरक्षकाचा भाऊ यांनी लाठी काठीचा धाक दाखवून व अश्लील शिवीगाळ करून पैसे देण्यास भाग पाडले. याबाबतची तक्रार सहायक वनसंरक्षक अधिकारी वणी यांच्याकडे देऊन महिला वनरक्षकाला निलंबित करा व दोन्ही वन मजुरांना व त्यांच्या भावावर कार्यवाही करा अशा प्रकारची तक्रार देण्यात आली होती असे तक्रारदार बंडु गोहणे यांचे म्हणणे आहे मात्र त्यांच्या तक्रारीची कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही  
 त्यामुळे ए.सि. एफ कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती तरी सुद्धा कोणतीही कारवाई करण्यात आली नाही अखेर सोमवारी त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post