दुखद बातमी, अॅड. विजया मांडवकर यांचे निधन, ★ वणी न्यायालयात आज वकिली कामकाज स्थगित...

वणी /

वणी न्यायालयात वकीली आणि राजूर ग्राम पंचायतीच्या माजी सदस्या अॅड. विजयाताई विश्वास शेळकी (मांडवकर) (50), रा. बोधेनगर, चिखलगाव यांचे मंगळवारी 25 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजता हृदयाघाताने निधन झाले.
 त्यांची अंत्ययात्रा बुधवारी सकाळी 11 वाजता त्यांचे राहते घर बोधे नगर येथून मोक्षधामसाठी निघणार आहे. त्यांच्या मागे पती व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

अॅड. विजया मांडवकर ह्या वणी येथील न्यायालयात वकील म्हणून कामकाज करीत होत्या. त्यामुळे वणी न्यायालयातील सर्व वकील त्यांना श्रद्धांजली म्हणून बुधवारी दिवसभर न्यायालयीन कामकाज स्थगित ठेवणार आहेत.

स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!💐

Post a Comment

Previous Post Next Post