वणी /
उन्हाळा सुरू झाला आणि तापमानातही वाढ झाली लखलखत्या उन्हामुळे पाण्यासाठी सर्वांचा जीव कासावीस होतो ग्रामीण भागासह शहरात येणारा प्रत्येक व्यक्ती थंड पाणी प्यायला मिळायला पाहिजे अशी सर्वांचीच अपेक्षा असते मात्र तसे होत नाही थंड पाण्याची बॉटल घ्यायला गेले तर पैसे मोजावे लागतात आणि सर्वच पैशाने पाणी विकत घेऊ शकत नाही त्यामुळे सामान्यांना पिणाच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी परमपूज्य 1008 आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या 33 व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त श्री जैन महिला मंडळ च्या वतीने वणी शहरातील गजबजलेल्या गांधी चौक येथील तुटी कमान जवळ पाणपोईचा उद्घाटन सोहळा 28 मार्च पार पडला. या पाणपोई चे उद्घाटन समाजसेवी विजयबाबू चोरडिया यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशन अध्यक्ष दीपक छाजेड, श्री जैन महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ प्रमिला चंद्रकुमार चोरडिया, सचिव रूपाजी खिवंसरा, सहसचिव विद्या मुथा, सदस्य ज्योतीबाई चोरडिया, प्रिया कटारिया, राखी कुचेरिया, शोभा खिवंसरा, अंशुमा झाबक, पुष्पा कोटेचा, प्रेमाबाई चोरडिया या सह जैन महिला मंडळाच्या सदस्य उपस्थित होत्या.