वणी /
शेतकरी लाॅन वणी येथे दिनांक 22 मार्च ला विदर्भाच्या मातीतील नृत्यकलावंताच्या सुप्त कलागुणाना वाव देण्यासाठी
मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्ता सौ. मनिषाताई सुरेंद्र निब्रड याच्या प्रमुख आयोजनात विदर्भ स्तरीय राजे नृत्य स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला..
या कार्यक्रमाचे उद्घाटन किरणताई देरकर याच्या हस्ते झाले तर अध्यक्ष म्हणून आशिष खुलसंगे अध्यक्ष वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी हे होते प्रमुख पाहुणे म्हणून अडव्होकेट देविदास काळे प्रमोद वासेकर अडव्होकेट पौर्णिमाताई शिरभाते माधव सरपटवार वंदना आवारी साधनाताई गोहोकार शारदाताई ठाकरे इत्यादीची उपस्थिती होते
आयोजक दाम्पत्य सुरेंद्र निब्रड सौ मनिषाताई सुरेंद्र निब्रड यांच्या या कामगिरीबद्दल प्रयास व क्रातिजोती फेडरेशन च्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला
या स्पर्धेत विदर्भातून नागपूर चंद्रपूर वरोरा भंडारा यवतमाळ वाशिम उमरखेड गोंदीया व स्थानिक व परिसरातील स्पर्धकानी या स्पर्धेत भाग घेतला. एकल नृत्य, समुह नृत्य कला प्रकार सादर करण्यात आल्या. अप्रतिम वेश भुषा रंगभुषा केशभुषा व गाण्याची निवड व इतर विषयावर स्पर्धकांनी आपले कौशल्य सादर केले व प्रेषकानी त्याच्या प्रत्येकाच्या कलेला दाद दिली
उपराजधानितील परीक्षकांनी या स्पर्धेचे परीक्षन केले त्यात गौरव श्रीरंग , शुभांगी सरोदे, अश्विनी मानेकर यांनी परीक्षणाचे काम पाहिले आयोजन समितीकडून या तीनही परिक्षकाचा सत्कार करण्यात आला.
या भव्य दिव्य कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन प्रियंका कोटनाके सह सागर मुने यांनी केले तर आभार आजोजिका मनिषाताई सुरेंद्र निब्रड यांनी मानले.