वणी /
शहरातील बाकडे पेट्रोल पंप जवळ डॉ. झाडे हॉस्पिटल समोर गुरुवारी २७ मार्च ला एका अनोळखी इसमाला बेदम मारहाण करून सराईत गुन्हेगाराने पळ काढला होता या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला प्रथम उपचारासाठी येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती चिंताजनक असल्याचे पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्या अनोळखी इसमाचा मृत्यू झाला आहे.
सदर व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून त्या व्यक्तीला मारहाण करुन खून करणारा सराईत गुन्हेगार अनिकेत दादाराव कुमरे, रा. सिंधी,(कुंभा) ता. मारेगाव याला पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी यांनी दारुच्या नशेत सदर इसमाला बेदम मारहाण केली. परंतु मारहाणीत मृत झालेल्या व्यक्तीला ओळखत नसल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले आहे.
आरोपी अनिकेत कुमरे यांनी ऑगस्ट 2023 मध्ये वणी तहसील कार्यालयाच्या मागे शासकीय इमारती मध्ये एका अनोळखी इसमाची अशाच पध्दतीने निघृण हत्या केली होती त्यावेळी त्याला अटक झाली होती तेव्हापासून तो कारागृहात होता मात्र काही दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला आणि त्यांनी पुन्हा एका अनोळखी इसमाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत व्यक्ती हा अंदाजे ४५ ते ५० वर्षाचा असून परिसरातून हरविलेले इसमाबद्दल किंवा मृतक इसमाला कोणी ओळखत असेल तर त्यांनी पोलीस निरीक्षक पो. स्टे. वणी गोपाल उंबरकर, मो.नं. 8788577840 किंवा तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक अश्विनी रायबोले मो. नं. 8766083544 या क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन वणी पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले आहे.