वणी /
चार पैसे जमा झाले की वेगवेगळ्या वाटेने ते कसे खर्च करायचे याबाबत हरहुन्नरी नागरिक वेगवेगळे मार्ग शोधतात. मग, कारण कोणतेही असो. वाढदिवस साजरा करणे ही तर आज फॅशन झाली आहे. मग यासाठी कितीही खर्च झाला तरी चालतो. पण या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन मेघदूत कॉलोनी चिखलगाव (वणी) येथील नितीन वासेकर यांनी त्यांच्या 'पत्नी' धन्वंतरी चारिटेबल फाउंडेशन च्या संचालिका सौ मेघा नितीन वासेकर यांचा वाढदिवस बाजीराव महाराज वृद्धाश्रम चिखलगाव येथील वृद्धाश्रमात साजरा केला.
यावेळी धन्वंतरी चारिटेबल फाउंडेशन चे नितीन वासेकर यांनी आरोग्य विषयक माहिती दिली.
वाढदिवसाला होणारा खर्च वृद्धाश्रमाला देऊन सर्व वृद्धांना कपडे आणि पोषक आहाराचे वाटप केले. वासेकर कुंटुंबीयाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.
'डिजे'च्या तालावर मोठमोठ्या हॉटेलमध्ये पार्टीचे नियोजन करून वाढदिवस साजरे करताना पहायला मिळते. यावर लाखो रुपयांची उधळपट्टीही होते. याला बगल देत नितीन वासेकर यांनी आपल्या पत्नीचा वाढदिवस अनाथ असलेल्या वृद्धाश्रमात साजरा करण्याचे ठरविले.
या वृद्धाश्रमात वृद्धासमवेत काही वेळ घालवून त्यांच्या दु:खावर फुंकर घालून आनंदी वातावरण निर्माण केले.
यावेळी बाजीराव महाराज वृद्धाश्रम संस्थेचे अध्यक्ष सुहास नांदेकर व सौ स्मिता नांदेकर तसेच वृद्धाश्रमातील वृद्ध उपस्थित होते.