वणी /
पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती जरी जामणी द्वारा आयोजित पशु प्रदर्शनी मध्ये पशुपालक डॉक्टर संकेत अलोने यांच्या स्वीटी या देशी कालवडीने प्रथम क्रमांक पटकावत उपस्थित पशुपालकांचे लक्ष वेधून घेतले तर स्वीटीची आई ढिल्लू हिने देशी गाई मध्ये पुरस्कार प्राप्त करीत लक्ष्मीबाई अलोने यांना सन्मान प्राप्त करून दिला.
शेतकऱ्यांना पशुपालनासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी आयोजित या प्रदर्शनीचे उद्घाटन आमदार संजय देरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर माजी आमदार वामनराव कासावार पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर विजय रहाटे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर क्रांती काटोले नगराध्यक्ष ज्योतीताई बिजगुणवार गटविकास अधिकारी रवींद्र सांगळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एडवोकेट राजीव कासावार प्रकाश कासार प्रकाश दिलीप भोयर व पशुधन विकास अधिकारी डॉक्टर निलेश राठोड इत्यादी मान्यवर उपस्थित होते
तालुक्यातील विविध गावांमधून पशुपालकांनी विविध गटात 500 च्या वर पशुपक्ष्यांची नोंद केली होती बैलजोडी देशी गाई शंकरी जनावरे कोंबडे शेळ्या मेंढ्या अशा विविध गटातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला विविध गटात पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना एकूण दोन लाख तीस हजाराची रक्कम प्रशस्तीपत्र व सन्मान चित्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर क्रांती काटोले यांनी केले उपायुक्त डॉक्टर विजय रहाटे यांनी आयोजना मागची भूमिका विशद करून शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली उद्घाटक आमदार संजय दरेकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत पशु आरोग्य आणि पशु सेवेसाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले मडावी यांनी संचालन केले प्रदर्शनीचे उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध आयोजन केल्याबद्दल डॉक्टर निलेश राठोड व त्यांच्या चमूचे सर्वांनी तोंड भरून कौतुक केले.