'स्थळ' मराठी सिनेमाची टीम आज वणी करांच्या भेटीला, दीप्ती टॉकीज मध्ये सायंकाळी 6 वाजता प्रमोशनल शो

वणी/

सचिन पिळगावकर प्रस्तुत 'स्थळ' या सिनेमाची संपूर्ण टीम मंगळवार 11 मार्च रोजी वणीकरांच्या भेटीला येत आहे. जत्रा मैदान स्थित दीप्ती टॉकीज मध्ये सायंकाळी 6 वाजता स्थळ सिनेमाचा प्रमोशनल शो आयोजित करण्यात आला असून मुख्य अभिनेत्री नंदिनी चिकटे सह संपूर्ण टीम प्रेक्षकांच्या भेटीसाठी राहणार आहे.
विदर्भातील कलाकारांना घेऊन बनविलेल्या स्थळ या सिनेमाची शूटिंग चंद्रपूर, वरोरा, चिमूर, वणी आणि आजुबाजूच्या परिसरात करण्यात आली आहे. निर्माते शेफाली भूषण, करण ग्रोवर, जयंत सोमलकर व रीना मल्होत्रा व जयंत सोमलकर यांनी निर्देशन केलेल्या या सिनेमात मुख्य भूमिका नंदिनी चिकटे हिने पार पाडली आहे. तरी वणीकर प्रेक्षकांनी आपल्या विदर्भातील चाहत्या मराठी कलाकारांची भेट घेण्यासाठी आज सायंकाळी दीप्ती टॉकीज येथे यावं. असे आवाहन टीम 'स्थळ' आणि दीप्ती टॉकीज संचालकांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post