विकास मिना यवतमाळचे नवे जिल्हाधिकारी

स्टिंग ऑपरेशन न्यूज/

संभाजीनगर येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असणारे विकास मिना यांची सोमवारी यवतमाळचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

डॉ. पंकज आशिया यांचे यवतमाळ येथून ६ मार्च रोजी समकक्ष पदावर अहिल्यानगर येथे बदली झाल्यानंतर आता त्यांच्या रिक्त स्थानी विकास मिना हे यवतमाळ जिल्हाधिकारी पदाची सुत्रे स्विकारतील.

विकास मिना हे २०१७ कॅडरचे आयएएस आहे. मुळचे राजस्थानमधील असणारे मिना यांची ऑल इंडीया रँक ही ५६८ होती. संभाजीनगर येथे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. आता आदिवासी बहुल असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाची मोठी जबाबदारी मिना यांच्यावर आली आहे.

सोमवारी तीन अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. त्यात मिना यांचा समावेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post