वणी /
सहकार क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या गोदावरी अर्बनच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान महिला अर्थसाक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यात वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या समाजातील कर्तृत्वान महिलांचा सन्मान केला आहे.
गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को ऑप. सोसा. ली. नांदेड चे संस्थापक ना. हेमंत पाटील सर, अध्यक्षा राजश्री पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर सर यांच्या नियोजनाखाली व डेप्युटी जनरल मॅनेजर सुरेखा दवे मॅडम, असिस्टंट जनरल मॅनेजर विजय शिरमेवार सर, रवी इंगळे सर यांच्या नेतृत्वात विविध कार्यक्षेत्रातील राज्यात महिला दिनाच्या निमित्ताने महिला सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याच अनुषंगाने वणी शाखेच्या वतीने वणीत कार्यक्रम घेण्यात आला तसेच त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सहायक पोलिस निरीक्षक सिता वाघमारे, अश्विनी रायबोले पोलिस उमहानिरीक्षक, तसेच शिव आनंद लाठी काठी संस्थेची प्रशिक्षक कु. तेजस्विनी राजु गव्हाणे, सौ प्रांजली ठाकरे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी वणी शाखेतील शाखा व्यवस्थापक विजय मोडक, सहायक शाखा व्यवस्थापक सुनील चिंचोळकर, अक्षय अने, कनिष्ठ अधिकारी सौ प्रांजली ठाकरे, सुरज चाटे, मंगेश करंडे, अमोल देउळकर, आतिष बुरेवार, जयवंत ओचावार तथा समस्त दैनिक, आवर्त ठेव अभिकर्ता उपस्थित होते.